Tuesday, August 16, 2016

Leh-Ladakh

परवा संध्याकाळी जेवायला बसलो होतो आणी जेवता जेवता बायकोने आठवण करून दिली … ह्याचवेळी एक वर्षाअगोदर तू लेह-लडाख च्या टूरसाठी श्रीनगरला पोहोचलेला होतास. डोळ्यासमोरून एकेक चित्र फिरू लागल…श्रीनगरला पोहोचल्यावर दल सरोवरावर एका हाउसबोटीत राहायची सोय,तिथला आम्हाला टोपी चढवणारा नावाडी,संचारबंदीमुळे जबरदस्ती श्रीनगरला वाढलेला एक दिवस, नंतरचा झोजिला पासचा कर्रर्र्रगीलपर्यंत(तिथल्या स्थानिक लोकांचा ऊच्चार) अगदी रोमांचकारी परुंतु पाऊसामुळे दरड कोसळण्याच्या शक्येतेमुळे धोकादायक झालेला प्रवास,दरीच्या अगदी काठाने गाडी जाताना पोटात पडलेला भला मोठा खड्डा, कारगील मधल्या तंबूत काढलेली रात्र,आर्मी कॅन्टीन मध्ये जेवण,कारगील ते रंग्दुमच्या प्रवासात अरण्यात मधेच कुठतरी थांबून एका भल्या मोठ्या खडकावर मिळून खाल्लेले घरचे खाऊ, रंग्दुमला पर्वता शेजारी ठोकलेले तंबू,रात्री केलेली शेकोटी, शेकोटीभवती बसून प्यालेले आर्मी ब्रांडचे "गरम पाणी", गोठवणा ऱ्या गारठयात तंबूत काढलेली रात्र, मध्यरात्री कधीतरी अचानक पडलेला बर्फ आणि "कोणाचेतरी" बेंबीच्या देठापासून ओरडणारी आवाजयुक्त किंकाळी "मी रात्रभर इथे राहिलो तर मारून जाईन रे वाचवा ", सामान घेऊन मिट्ट काळोखात आसरा शोधायला धावणारे सर्व गडी, एका धनगराच्या दगडी घरात घेतलेला आसरा,त्याच्या प्रार्थनेच्या खोलीत ऊब मिळाल्यामुळे उजेडास्तव ढाराढूर ताणून देणारे आम्ही,उठल्यावर गुडगुड टी , अख्या प्रवासात खाल्लेली असंख्य मॅगी पॅक्स,परत प्रवास,मधेच कुठतरी उंच डोंगरात थांबून जाडजूड मोरमॉन्टच्या बिळाजवळ झोपून काढलेला त्यांचा रानफुले खात असलेला फोटू, डोंगरातून प्रवास करताना मध्येच लागलेली छोटी छोटी गावं,त्यात असलेली नीटनेटकी घरे ,एखाद्या घराच्या ओटीवर खेळत असलेली छोटीशी गोंडस मुले,आमच्या गाडीला बघून त्यांनी केलेले टाटा,त्याचं ते निरागस हास्य आणि हात दाखवण बघून माझ्या छोटीच्या आठवणीने हृद्यात झालेली कालवाकालव,उंचचउंच बर्फाळलेल्या डोंगरावरून प्यायचा पाणी खाली आणायला पद्धतशीरपणे केलेले पाण्याचे मार्ग ,त्याच्या नंतरचे बरेचशे अंतर कापून नजरेत येणारी झन्सकार दरी (zanskar valley),झन्सकार दरीत पदुममधे एका होमस्टेत काढलेल्या ३ रात्र,तिथेच खाल्लेले स्थानिक पदार्थ ,मोमोस आणि थुक्पा, उंच डोंगरात अगदी कडेवर वसलेल्या बर्याच रंगीत गोम्पानां (Monastery) दिलेल्या भेटी.वर्षानूवर्षे चालत आलेली परंपरा,गोम्पामधे राहणारे ते लामा (Monks),आणि शिक्षण घेणारी लालबुंद गालांची इवलीशी छोटी छोटी मुलं,त्या लहानग्यांच्या निष्पाप डोळ्यात हरवून गेलेला मी, इनोवा चालवणारा व थोडासा शांत स्वभावाचा परंतु डोंगरातल्या खडकाळ रस्त्यातून सफाईदारपणे गाडी काढणारा युसुफभाय,स्कॉरपिओ चालवणारा आणि आम्हाला स्थानिक गाणी तसेच बरेच रीतीरिवाज व तिथले बारकावे प्रेमाने समजवणारा व अगदी डॉट सांगितलेल्या वेळेवर हजर राहणारा लोभज्यांग (ह्यानेच आम्हाला जुले बोलून स्थानिक लोकांना कसं अभिवादन करावं ते शिकवलं ), तिथे भासलेली आणि जणू परिसरातच मिसळलेली व सगळीकडे पसरलेली प्रचंड शांतता,परतीचा प्रवास,दरांग-दुरुंग हिमनदी,मधेच कुठल्यातरी दुर्गम ठिकाणी अशक्य असा निळ्या पाण्याचा जलाशय बघून थांबवलेली स्कॉरपिओ, जवळच असून देखील तिथे चालत पोचताना झालेली माझी दमछाक,(एकूण ह्या संपूर्ण प्रवासात नवीन हवामानाशी किंवा परिस्थितीशी (High Altitude) नीट न रूळण्यामुळे बराचसा प्रवासात मी गोगलगाय किवां Zombie झालो होतो… म्हंजी व्हायचं काय की ह्या समुद्रसपाटीपासूनची उंच व विरळ ऑक्सिजन असलेल्या वातावरणात दोन पावलं टाकली रे टाकली का माझ्या हृदयाचे ठोके आणि छातीची धडधड असली वाढायचे की न सांगितलेली बरी), असो , त्या जलाशयाजवळ एकदाशे पोहोचल्यावर त्या निळ्या पाण्यात पाय पसरून बसायला आलेली मजा,परत गाठलेलं कारगील,तिथे केलेली खरेदी,महामार्गा शेजारी असलेल्या ढाब्यात घेतलेलं जबरदस्त चविष्ट जेवण (आम्ही बटर रोटीची ऑर्डर दिल्यावर तंदूर मधल्या गरम रोटीवर अतिशय काळजीपूर्वक व सावकाशपणे डब्यातलं अमूल त्यावर थापणारा धाब्याचा कॅशियर / मालक )…. वेगळ्याच अश्या दुनियेत मी रमून गेलो होतो आणि एकनाअनेक चित्र सरसरत डोळ्या समोरून फिरत होती तेवढ्यात अचानक माझी मांडी हलवून माझी छोटी मुलगी मला म्हणाली ड्याडा तुझा फोने आहे… भानावर येउन मी तिच्या हातातला माझा मोबाईल घेतला आणि कानाला लाऊन "हॅलो" म्हणालो . पलीकडून आवाज आला "जय हिंद साब … मै कॅप्टन अजमीनदर पाल बोल रहा हू,पंजाब रेजिमेंट से, आप हमें ठीक एक साल पहिले झोजिला पास में मिले थे.…… !!!!! (TO BE Continued….)
View From Our Tent at Rangdum ....Dat is Before the temperature dropped down a lil bit ...to -4°C

No comments: